VIDEO : दुर्मीळ आजार म्युकरमायकोसिसचे उपचार अन् लक्षणे, तज्ज्ञांशी बातचीत - म्युकरमायकोसिस
चंद्रपूर - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा भयंकर प्रसार होत आहे. यात बऱ्या होणाऱ्या रुग्णांसमोर आता एक नवीन आव्हान उभे ठाकले आहे. ते म्हणजे म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार. स्टिरॉइड्ससारख्या औषधांच्या भडिमारामुळे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती फार कमी झाली आहे, किंवा ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे अशा रुग्णांना हा आजार गाठत आहे.