Mother Bear Video : भर उन्हात पिलांना पाठीवर घेऊन 'ती' निघाली पाण्याच्या शोधात - अस्वलाचा व्हिडिओ
नर्मदापुरम - नुकतेच जागतिक मदर्स डे पार पडला आहे. असाच आईचे आपल्या बालकांप्रती आसलेले वात्सल्य सर्वांना डोळ्यासमोर ठेवणारा एक सातपुडा व्याघ्र प्रकल्पातील मधईच्या जंगलातून एक भावूक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून पर्यटक चक्रावले आहेत. कडक उन्हात मादी अस्वल आपल्या मुलांची तहान भागवण्यासाठी त्यांना पाठीवर घेऊन तलावावर जात असल्याचा हा व्हिडिओ आहे. जंगल सफारीदरम्यान काही पर्यटकांनी हे दृश्य पाहिले आणि त्याचा व्हिडिओ बनवला, त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला. सुमारे 1 मिनिटाच्या व्हिडीओमध्ये अस्वलाचे कुटुंब पाहून पर्यटकही रोमांचित झाले. व्हिडीओचे वैशिष्ट्ये म्हणजे मदर्स डेच्या दिवशी हे चित्रीकरण करण्यात आले आहे. ज्यामध्ये मुलांप्रती भक्तीची भावना प्राण्यांमध्येही दिसून येते.