Dolby Issue Satara उदयनराजे म्हणतात, साताऱ्यात डॉल्बी वाजणारच, पाहा, व्हिडिओ - खासदार उदयनराजे सातारा
सातारा जिल्ह्यात डॉल्बी वाजलाच पाहिजे, अशी परखड भूमिका साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले MP Udayanaraje Bhosale यांनी घेतली आहे. जिल्हा प्रशासनाने डॉल्बीला विरोध केल्यानंतर चिडलेल्या उदयनराजेंनी काहीही झाले तरी साताऱ्यात डॉल्बी Dolby Issue in Satara वाजणारच, असा थेट इशाराच प्रशासनाला दिला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा प्रशासनाने डॉल्बी का नको, याचे कारण देण्याची मागणीही उदयनराजेंनी केली आहे. कौटुंबिक परिस्थिती बिकट असती आणि शिक्षण मिळाले नसते तर हे लोक पदावर जाऊ शकले असते का? सुदैवाने त्यांची परिस्थिती चांगली होती म्हणून ते शिकले आणि त्या पदावर गेले, अन्यथा या लोकांनी सुद्धा हा व्यवसाय पत्करला असता, अशा शब्दांत उदयनराजेंनी डॉल्बी व्यावसायिकांची बाजू घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुनावले आहे.