महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

BJP Leader Threatens Voter : घरामध्ये कॉंग्रेसचे झेंडे दिसताच भाजपाचे प्रह्लाद पटेल भडकले; दिली धमकी - BJP Mayor Candidate Prahlad Patel

By

Published : Jul 11, 2022, 10:15 PM IST

रतलाम (मध्य प्रदेश) - रतलाममध्ये भाजपचे महापौरपदाचे उमेदवार प्रह्लाद पटेल मतदारांना धमकावत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रल्हाद पटेल एका बस्तीवर प्रचार करण्यासाठी गेले होते, तिथे स्थानिक लोकांनी काँग्रेसचे झेंडे लावल्याने प्रह्लाद पटेल संतापले. व्हिडिओमध्ये रहिवाशांच्या समस्या ऐकून घेण्याऐवजी नगराध्यक्ष उमेदवार नगरसेवक उमेदवाराला सूचना देऊन मतदारांना धमकावताना दिसत आहेत. महापालिका निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष आपला विजय मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी भाजपचे उमेदवार प्रह्लाद पटेल यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, व्हिडिओमध्ये प्रह्लाद पटेल जनतेवर रागावताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये प्रह्लाद पटेल असे म्हणताना दिसत आहेत की, "ज्या घरांमध्ये काँग्रेसचे झेंडे लावले आहेत, त्या सर्वांचे फोटो काढा. नगरसेवक जी, मी सांगतोय या सर्व सुविधा बंद करा. जर 5, 6 घरांची मते मिळणार नाहीत तर. काही फरक पडणार नाही. या लोकांना धडा शिकवणे आवश्यक आहे." हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार मयंक जाट यांनी याला भाजप नेत्यांचा अहंकार असल्याचे वक्तव्य केले आहे. ( MP Urban body Election 2022 ) ( BJP mayor candidate Prahlad Patel threatens voters ) ( Congress mayor candidate targets Prahlad Patel )

ABOUT THE AUTHOR

...view details