Mumbai Police Rana Video : राणा दाम्पत्याला पोलिसांनी चहापाणी दिले; मुंबई पोलीस आयुक्तांकडून व्हिडिओ शेअर - राणा दाम्पत्य चहापाणी घेतानाचा व्हिडिओ
मुंबई - खार पोलीस स्टेशनमध्ये (Khar Police Station) खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांना चहापाणी देताना पोलीस कर्मचारी एका व्हिडिओत (Mumbai CP Rana Video) दिसत आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी स्वत: ट्विटरवर हा व्हिडिओ शेयर केला आहे. पोलीस स्थानकात बसलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे चहा पीत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तसेच त्यांच्यासमोर पाण्याची बाटलीही असल्याचे या व्हिड़िओत दिसत आहे. राणा दाम्पत्य सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, कोठडीत पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळाली, तसेच मागासवर्गीय असल्याने रात्रभर पाणी दिले नाही, असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. याबाबतचे पत्रच त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिले आहे.
Last Updated : Apr 26, 2022, 3:52 PM IST