खासदार नवनीत राणांनी घेतला आकाश पाळण्याचा आनंद - mp navneet rana
अमरावती - ज्याप्रमाणे भारतीय संस्कृतीत होळी सणाला महत्त्व आहे , त्याचप्रमाणे अमरावतीच्या मेळघाटातील आदिवासी बांधवांचा महत्त्वाचा सण म्हणजे टिटवा गावातील मोती मातेची यात्रा. आदिवासी हा उत्सव उत्साहात मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आदिवासी लोकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा देखील दरवर्षी या उत्सवात सहभागी होतात. यावर्षी देखील राणा यांनी या उत्सवाला हजेरी लावली. मोती मातेचे पूजन करून राणा यांनी आदिवासी बांधवांसोबत आकाश पाळण्यात बसण्याचा आनंद घेतला. त्याचप्रमाणे संपूर्ण यात्रा परिसरातील विविध खेळांचा मनमुराद आनंद देखील लुटला. दरम्यान, मेळटातील समस्या लवकरच मार्गी लावणार असल्याचा विश्वास देखील यावेळी खासदार राणा यांनी आदिवासींना दिला.