Navneet Rana : 'महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण दूर करण्यासाठी हनुमानाला साकडं' - महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण दूर करण्यासाठी हनुमानाला साकडं नवनीत राणा
नागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवसास्थान असलेले मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याच्या वादावरुन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 36 दिवसानंतर राणा दाम्पत्य आज ( 28 मे ) अमरावतीला जाणार आहे. त्यापूर्वी राणा दाम्पत्याने युवा स्वाभिमान पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांसह उपस्थित राहून नागपूरमधील रामनगर येथील हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे पठण केले. काही दिवसांपूर्वी दिल्लीत देखील हनुमान चालीसाचे पठण केले. मात्र, त्या ठिकाणी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागला नाही. पण. महाराष्ट्रात हनुमान चालीसा वाचण्याचा संकल्प केल्यानंतरचं आमच्या समोर अनेक समस्या आल्या, असा आरोप राणा दाम्पत्याने केला आहे. तसेच, महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण दूर करण्याचे हनुमानाला साकडं घातल्याचे नवनीत राणांनी म्हटले ( mp navneet rana and mla ravi rana recite hanuman chalisa ) आहे.