VIDEO : नंदगिरी अतिथीगृहात राणा दाम्पत्यांनी केले बुकिंग; शिवसैनिक आक्रमक - हनुमान चालीसा पठण राणा दाम्पत्य
मुंबई - खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहे. परंतु ते मुंबईत सध्या कुठे आहेत, याचा थांगपत्ता कुणालाच लागत नाही. परंतु मुंबई विमानतळ शेजारी असलेल्या नंदगिरी राज्य अतिथीगृहामध्ये राणा दाम्पत्याच्या नावाने बुकिंग झाल्याची माहिती समोर आली आहे. म्हणूनच या अतिथी गृहाबाहेर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून येथे नवनीत राणा व रवी राणा यांच्या नावाने घोषणाबाजी करत करताना हे दिसून येत आहेत. विशेष करून जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी समोर यावे. गनिमीकाव्याने अशा पद्धतीने लपून-छपून त्यांनी येथे येण्याचा प्रयत्न करू नये, ते आल्यास त्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल, असे शिवसैनिकांनी सांगितले आहे.