MNS BJP Morcha : कल्याण डोबिंवलीतील पाणी प्रश्नावरुन भाजपा-मनसेचा महापालिकेवर संयुक्त मोर्चा - भाजपा मनसे मोर्चा कल्याण डोबिंवली महापालिका
ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ( Kalyan Dombivali Municipal Corporation ) हद्दीतील पाण्यावरून राजकारण तापले असून आज (सोमवारी) भाजपा व मनसेच्या वतीने महापालिका मुख्यालयावर ( MNS BJP Morcha ) मोर्चा काढण्यात आला. यावेळी पाणी प्रश्न सुटत नसेल तर खड्ड्यात गेली आमदारकी एक दिवस महापालिकेला टाळे ठोकणार बघू मग कोण काय करतो, असा इशारा मनसे आमदार राजू पाटील ( MNS MLA Raju Patil ) यांनी पालिका प्रशासनाला दिला. तर भाजपा आमदार रवींद्र चव्हाण ( BJP MLA Ravindra Chavan ) यांनीही सत्तेचा माज नसता तर पाणी प्रश्न पाच वर्षांपूर्वीच सुटली असता अशी पाणी प्रश्नावर प्रशासनावर प्रखर टीका केली. २७ गावांसह महापालिका हद्दीतील पाणी प्रश्नावर आज मनसे व भाजप आमदाराच्या वतीने संयुक्त मोर्चा काढण्यात आला.