राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर.. मनसेचा बॅनरद्वारे इशारा - raj thackeray ayodhya visit oppose
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS chief Raj Thackeray ) यांच्या ५ जूनच्या प्रस्तावित अयोध्या दौऱ्यावरून राजकारण तापले आहे. एकीकडे उत्तरप्रदेशच्या कैसरगंजचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह ( BJP MP Brijbhushan Sharan Singh ) यांनी राज ठाकरेंच्या अयोध्येत येण्याला विरोध दर्शवला आहे. उत्तर भारतीयांशी झालेल्या गैरवर्तनासाठी मनसे प्रमुखांना जबाबदार धरत त्यांनी माफी मागावी अशी मागणी ते करत आहेत. आयोध्या दौऱ्याला होत असलेल्या विरोधाला प्रत्युत्तर म्हणून आता मनसेतर्फे बॅनरद्वारे इशारा देण्यात आला आहे. लालबाग येथे लावलेल्या बॅनरमध्ये राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, असे लिहिलेले आहे.