Minister Ravindra Chavan धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंच्या ओरिजनल शिवसेनेलाच मिळणार - रवींद्र चव्हाण - एकनाथ शिंदे
रत्नागिरी धनुष्यबाण चिन्ह हे 100 टक्के एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहिल. आम्हाला सगळ्यांनच असं वाटतंय की चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या ओरिजिनल शिवसेनेलाच मिळेल. असा विश्वास भाजपा नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण Minister Ravindra Chavan reaction यांनी व्यक्त केला आहे. याबाबत बोलताना मंत्री चव्हाण म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली बाजू कोर्टात मांडली Election Commission decision on Shiv Sena symbol आहे. माझ्यासकट भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार असा विश्वास वाटत आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदार खासदार यांच्याकडे बाळासाहेबांचे विचार आहेत. राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व ते पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह Shiv Sena symbol Dhanushban शिंदे यांच्या ओरिजनल शिवसेनेलाच मिळणार असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे.