Jitendra Awhad On Raj Thackeray : 'राज ठाकरे उत्तम नकलाकार' - Raj Thackeray great imitator
जळगाव : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल ठाण्यात उत्तर सभा झाली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिका केली. या टिकेला आव्हाड यांनी जळगावात उत्तर ( Minister Jitendra Awhad On Raj Thackeray in jalgoan ) दिले आहे. ते म्हणाले की, राज ठाकरे हे उत्तम नकलाकार आहेत, इथे स्टैंड अप कॉमेडीयनच्या जागा खूप खाली आहेत. त्यांनी उपयोग करावा. माझा चेहरा नागा सारखा आहे असे त्यांनी नकल करून दाखवल आहे. माझा चेहरा नागासारखा आहे. त्याचा मला अभिमान आहे, पण त्यांच्या चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागा सारखा आहे हे राज ठाकरे यांनी आरशात तपासून घ्यावे. यांनी कधीही बहुजन समाज्याचा इतिहास वाचला नाही यांनी नेहमी पुरंदरेंचा इतिहास वाचला, ज्या पुरंदरेंनी जेम्स लेंकला माहिती देऊन आमच्या जिजाऊची बदनामी केली, ते यांचे आदर्श आहेत. अशी त्यांनी टीका केली.