Shivsainik Joined Shinde Group शिवसैनिकांनी सकाळी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, संध्याकाळी शिंदे गटात प्रवेश.. पाहा व्हिडिओ - एकनाथ शिंदे
नवी मुंबई उरण तालुक्यातील शेकडो शिवसैनिकांनी बुधवारी शिवसेनेचं नवं पक्षचिन्ह असलेली मशाल घेऊन मुंबई गाठली व उद्धव ठाकरे यांची भेट Shivsainik Met Uddhav Thackeray घेतली. रात्री त्यातील काही शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला Shivsainik Joined Shinde Group आहे. उरण येथील शेकडो शिवसैनिक बुधवारी शिवसेनेचं नवं पक्षचिन्ह मशाल घेऊन मुंबईत पोहोचले. मातोश्री निवासस्थानी जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांची भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरेनीं शिवसैनिकांशी संवाद साधत शिवसेना थांबणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला. उरण परिसरात असणाऱ्या उलव्यातील शिवसेना shivsena शहर प्रमुख व शाखा प्रमूख व दोन महिला पदाधिकारी यांनी शिंदे गटाचे रुपेश पाटील अतुल भगत प्रसाद परब यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात Shinde group प्रवेश केला. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा शिंदे गटाने धक्का दिल्याचे पाहायला मिळाले.
Last Updated : Oct 13, 2022, 10:09 AM IST