VIDEO : मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतली सर्व धार्मिक स्थळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक - मुंबई पोलीस आयुक्तांच्या उपस्थित मुंबईत बैठक
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे विरोधात पुकारलेल्या आंदोलनानंतर इशारानंतर मुंबई पोलिसांनी मशिदीवरील भोंगे संदर्भात नियमावली आखून दिली होती. याच पार्श्वभूमीवर आज मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मंदिर, चर्च, बुद्ध विहार या धार्मिक स्थळाचे विश्वासू तसेच पदाधिकाऱ्यांची मुंबई पोलीस आयुक्तालयात बैठक बोलवण्यात आले होते. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर याच्यासह बांद्रा येथील चर्चचे धर्मगुरू तसेच बुद्ध विहारचे पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 45 डिसेबल या नियमानुसार सर्वांना मंदिरामध्ये तसेच इतर धार्मिक स्थळांमध्ये भोंगे लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर मुंबई पोलिसांकडून परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. या संदर्भात या सर्व धार्मिक स्थळांच्या पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आले आहे.