....तर आपण मुख्यमंत्र्यांचे आयुष्यभर जोडे पुसू - Manohar Patil challenged Eknath Shinde
शिवसेनेची बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून 40 आमदार फोडले. या चाळीस आमदारांसह भाजपाशी युती करून त्यांनी राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली. राज्यात असलेले महाविकास आघाडी सरकार पाडलं मात्र आपल्या सोबत आलेले 40 आमदार कधीही पडणार नाहीत. चाळीस आमदारांपैकी एकही आमदार पडल्यास आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ शेती करायला जाऊ असं आव्हान विरोधकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी थेट सभागृहात केलं होतं. मात्र जळगावचे संपर्कप्रमुख मनोहर पाटील यांनी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देत म्हणाले जर सर्वच्या सर्व 40 आमदार निवडून आले तर आयुष्यभर आपण त्यांचे जोडे पुसू असे आव्हान दिले आहे. मात्र या चाळीस आमदारांपैकी काही आमदार पडल्यास मुख्यमंत्री संन्यास घेतील का असा सवालही एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला आहे.