Video : मासेमारी करायला गेलेली बोट खोल समुद्रात बुडाली.. पहा व्हिडीओ.. - Arabian Sea
मंगळुरू (कर्नाटक): खराब हवामानामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी निघालेली एक बोट अरबी समुद्रात बुडाली. ही घटना काल (शनिवारी) सायंकाळी घडली आणि आज उघडकीस आली. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पानंबूरपासून सुमारे 90 नॉटिकल मैल खोल समुद्रात ही घटना घडली. खराब हवामानामुळे समुद्र खवळला, त्यामुळे मासेमारी करणारी बोट बुडाली. बोटीतील 11 मच्छिमारांना जवळच असलेल्या दुसऱ्या जहाजाने वाचवले. ( boat sank while going for deep sea fishing ) ( Arabian Sea )