महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 1, 2022, 7:11 PM IST

ETV Bharat / videos

LONDHE On Political Crisis : देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला चेक मेट; भास्कर लोंढे

नागपूर - गुरुवारचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी ( Maharashtra's Politics Has A Different Twist ) देणारा ठरला आहे. न भूतो न भविष्य अशी अनेक अर्थ असलेली ऐतिहासिक घटना महाराष्ट्राने बघितली आहे. भारतीय जनता पक्षाचे चाणक्य जाणारे देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी मनाचा मोठेपणा दाखवत मुख्यमंत्री पदाचा स्वीकार न करता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकून सर्वांनाचं आश्चर्याचा धक्का दिला. फडणवीसांचा हा निर्णय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात मास्टर स्टोक आहे, असं मत लोकशाही वार्ता या ज्येष्ठ पत्रकार भास्कर लोंढे यांनी व्यक्त केले आहे. केवळ सत्ता आणि पद मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस राजकारण करत असल्याचा आरोप होत होता. मात्र त्यांनी सर्वानाच आश्चर्याचा धक्का देत एकनाथ शिंदे यांना थेट मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवले आहे. त्यामुळे टीकाकारांचे तोंड बंद झाले आहे, असेही देखील भास्कर लोंढे म्हणाले आहेत. भारतीय जनता पक्षाने आज शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना थेट मुख्यमंत्रीपदी विराजमान केल्यामुळे याचा मोठा फायदा हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे. याचे दूरगामी परिणाम ओळखूनच भारतीय जनता पक्षाने शिंदे यांना मुख्यमंत्री केले असावे, असेही मत लोंढे यांनी व्यक्त केले. शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चेकमेट केले असल्याचे भास्कर लोंढे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details