Nana Patole : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरुन नाना पटोलेंचा भाजपला इशारा; म्हणाले, परिणाम भोगावे लागतील
मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झालेली आहे. त्याला सर्वस्वी केंद्रातले भाजप सरकार जबाबदार आहे. याला कुठला पुरावा देण्याची गरज नाही. ईडी, आयकर विभाग, सीबीआय या यंत्रणांचा वापर करुन 2019 पासून काँग्रेसच्या लोकांना निवडून दिलेले सरकार पाडण्याचे प्रयत्न भाजपकडून सतत होत आहेत. त्याचप्रमाणे राज्यपालांनी राष्ट्रपतींना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली माहितीही मिळाली आहे. महाराष्ट्राची बदनामी करण्याचे सातत्याने प्रयत्न होत आहेत. परंतु, भाजपला या सर्वाचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिला ( Nana Patole Criticized Bjp ) आहे. ते 'ईटिव्ही भारत'शी बोलत होते.
Last Updated : Jun 26, 2022, 3:46 PM IST