Raj Thackeray News : ...तर आम्ही हनुमान चालीसा वाजवणारच; राज ठाकरे ठाम, पाहा व्हिडिओ - मशिद लाऊडस्पीकर हटवो आंदोलन
मुंबई - मशिदीवरील लाऊडस्पीकर हटवण्याच्या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray News ) यांनी आवाहन केले होते. ते हटवले नाही तर आम्ही मशिदी समोर हनुमान चालीसा पठण करणार असे त्यांनी सांगितले होते. याबाबत आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद ( Raj Thackeray Press On Mosque Loudspeaker Issue ) घेतली. यावेळी ते म्हणाले की, विश्वास नांगरे पाटलांनी सांगितले की, मुंबईतील इतक्या मशिदींचे भोंगे लावण्यासाठी परवानगी मागण्यात आली. मुंबईतील अनेक मशिदी या अनधिकृत आहेत. त्यांना परवानगी कशी दिली जाते, हा विषय आकलान पलीकडे आहे. हा प्रश्न फक्त सकाळच्या आजान पर्यंत मर्यादित नाही. ज्या ज्या वेळी भोंगा लावून आजान होईल तेव्हा तेव्हा आम्ही हनुमान चालीसा लावू, ( hanuman chalisa row ) असेही राज ठाकरे म्हणाले. आम्हाला एका कार्यक्रमासाठी एक परवानगी दिली जाते. यांना 365 दिवसांची परवानगी कशी दिली जाते, असाही सवाल राज यांनी पोलिसांबद्दल उपस्थित ( Raj Thackeray On Mumbai Police ) केला. अनधिकृत भोंगे उतरवले गेले पाहिजे. हे एक दिवसांचे आंदोलन नाही. जोपर्यंत भोंगे उतरवले जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहाणार आहे असे राज ठाकरे पत्रकार म्हणाले.
Last Updated : May 4, 2022, 3:29 PM IST