Prithviraj Patil : महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील साईचरणी नतमस्तक - prithviraj patil visit shirdi saibaba darshan
शिर्डी ( अहमदनगर ) - महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील ( Prithviraj Patil ) यांनी आज ( 23 एप्रिल ) शिर्डीच येत साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. महाराष्ट्र केसरी दरम्यान पटकावलेली अकरा किलो वजनाची चांदीची गदा साईबाबा चरणी ठेवत पृथ्वीराजने आपल्या पुढील ध्येयासाठी साकडे घातले आहे. यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाला की, तालीम आणि आखाडे यांच्याशी नाळ जोडली असल्याने लहानपणापासून पैलवान व्हायच हेच एकमेव ध्येय होत. ते आता साताऱ्यातील स्पर्धेत पूर्ण झाले. पुढील वाटचाल ही ऑलंपिक असून, त्यासाठी तयारी सुरु आहे.