Ashadhi Wari 2022 : विठ्ठल मंदिराला सुविधा देण्याकरिता हात आखडता घेतला जाणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Pandharpur Wari
पंढरपुर (सोलापूर ) - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. विठ्ठल मंदिर समितीने सत्कार केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठल मंदिराला सुविधा देण्याकरिता हात आखडता घेतला जाणार नसल्याचे सांगितले. तसेच मंदिर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवू, अशी त्यांनी ग्वाही यावेळी दिली.
Last Updated : Jul 10, 2022, 8:55 AM IST