महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : आमदार रवी राणांच्या वाढदिवसानिमित्त युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांकडून 'महाआरती' - आमदार रवी राणा वाढदिवस

By

Published : Apr 28, 2022, 7:43 PM IST

अमरावती - बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसानिमित्त आज (गुरुवारी) शहरातील श्री अंबादेवी आणि एकवीरा देवी मंदिर तसेच साई नगर परिसरात स्थित साईबाबा मंदिरात युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने महाआरती करण्यात आली. युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आमदार रवी राणा यांचा वाढदिवस श्रम दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त साईनगर येथील साई साईबाबा मंदिर परिसरात गरिबांना अन्नदानसह कपड्यांचे वितरण करण्यात आले. आमदार रवी राणा यांचा वाढदिवस असताना ते सध्या कारागृहात आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details