राजकारणातील अनेक गुपीतं काळाआड; प्रणव मुखर्जींच्या जीवनप्रवासावर एक दृष्टीक्षेप
नवी दिल्ली - चार दशके भारतीय राजकारणात सक्रीय असलेले नाव म्हणजे 'प्रणव मुखर्जी'. स्वातंत्र्यापुर्वीपासून आधुनिक भारताच्या निर्मीतीपर्यंत अनेक स्थित्यंतरांचे ते साक्षीदार राहीले. अनेक पक्ष, देश-विदेशातील राजकीय घडामोडी, काँग्रेसपक्षाची वाटचाल यासह अनेक जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. याच आणि अशा अनेक घटनांचा उलगडा करणारा आणि प्रणव मुखर्जींच्या कारकिर्दीचा ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा.