VIDEO : शिरुर तालुक्यातील वढू-आपटी रोडवर बिबट्याचे दर्शन, नागरिक भयभीत - बिबट्याचे दर्शन
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील वढू - आपटी रोडवर शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले असून रात्रीच्या वेळी उसाच्या शेतात जात असताना शेतकरी स्वप्निल छबाजी कोतवाल या शेतकऱ्याला बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी बिबट्या वावरताना दिसला असताना पुन्हा सकाळी तोच बिबट्या परिसरामध्ये वावरताना अनेकांना दिसून आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.