RS Election 2022 : महाविकास आघाडीतील नेत्यांना एकमेकांवर विश्वास नाही - हरिभाऊ बागडे - राज्यसभा निवडणूक २०२२ हरिभाऊ राठोड
मुंबई - राज्यसभेसाठी मतदान ( RS Election 2022 Voting ) पक्रिया सुरू झालेली असताना आता निवडणुकीत रंगत वाढलेली आहे. महाविकास आघाडीतील पक्षांना एकमेकांवर विश्वास नसल्याने ते त्यांच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मतांचा कोटा त्यांनी वाढवला आहे, असे विधान भाजप वरिष्ठ नेते आमदार हरिभाऊ राठोड केलेलं ( Haribhau Rathod Criticized MVA ) आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मतांचा कोटा हा ४२ वरून ४४ केल्याने शिवसेना नाराज असल्याचं बोललं जात आहे, याबाबत त्यांनी हे विधान केलं.