VIDEO : 'राज्यपालांनी अस्खलित मराठीतून अभिभाषण केल्याने सरकारने त्यांचा गौरव करायला हवा' - Assembly budget session 2021
मुंबई - महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. दुसऱ्या दिवशी भाजप नेते वाढीव वीज बिल, सेलेब्रिटी ट्विट व शेतकरी मुद्द्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, की नरेंद्र मोदींवर वैयक्तिक टीका करणे, माजी मुख्यमंत्र्यांना शरीरयष्टीवरून चिडवणे सभागृहाची संस्कृती नाही. राज्यपालांनी अस्खलित मराठी भाषेतून भाषण केल्याने राज्य सरकारने त्यांचा गौरव केला पाहिजे.