Landslide Badrinath Highway : बद्रीनाथ महामार्गवर दरड कोसळली; सुदैवाने कोणतीही जिवीत हानी नाही - बद्रीनाथ महामार्गवर दरड कोसळली
उत्तराखंड - उत्तराखंड मधील चमोली येथे बद्रीनाथ महामार्गावर बलदौदाजवळ दरड कोसळली ( Landslide Badrinath Highway ) आहे. या भूस्खलनात डोंगरावरुन मोठमोठे दगड आणि झाडे रस्त्यावर पडले आहे. सुदैवाने दरड कोसळताना या मार्गावरुन एकही वाहन जात नव्हते, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. यापूर्वी 22 एप्रिलला बलदौडा पुलाजवळ दरड कोसळल्याने बद्रीनाथ महामार्गावर विस्कळीत झाला होता. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.