Land Sliding Video : देहरा रस्त्यावर भूस्खलन; मुघल राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद - Land Sliding Video
श्रीनगर (जम्मू-कश्मीर) - जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्याला मुघल राष्ट्रीय महामार्गाशी ( Mughal National Highway ) जोडणारा रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. देहरा रस्त्यावर भूस्खलन झाले ( land sliding at Dehra Street ) आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजौरी जिल्हा आणि पूंछ जिल्ह्यातील सीमावर्ती भागात रस्ते बांधणीमुळे भूस्खलन झाल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा रस्ता राजौरी ते सुरणकोट आणि मुघल महामार्ग हा एकमेव दुवा आहे. जो ठाणे मंडीतील लोकांना खोऱ्याशी जोडतो. रस्ता पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र कारवाई फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, जोपर्यंत रस्ता चालण्यायोग्य होत नाही तोपर्यंत कोणत्याही वाहनाला जाऊ दिले जात नाही. रस्ता दुरुस्त होईपर्यंत नागरिकांनी येथून प्रवास करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.