महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : धुळ्यातील लळींग पर्यटन स्थळाने पर्यटकांना घातली भुरळ! - लळींग पर्यटन स्थळाने घातली पर्यटकांना भुरळ

By

Published : Jul 10, 2022, 7:21 PM IST

धुळे - धुळे जिल्ह्यात पावसाच्या लहरी पणाचा फटका कृषी क्षेत्रावर जाणवत असला तरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. जिल्ह्यात ६ जुलैच्या सकाळी ८ वाजेपर्यंत पावसाच्या सरकारी आकडेवारीनुसार ९२.४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस शिरपूर तालुक्यात १३१.४ मिलीमीटर, तर सर्वात कमी पाऊस शिंदखेडा तालुक्यात ११२.९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. धुळे शहरापासून साधारण ८ ते १० किलोमीटर अंतरावर असलेल्या लळींग या पर्यटन स्थळावर हिरवळीची चादर पांघरलेला परिसर पहावयास मिळत आहे. त्यात प्रवाहित झालेला धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details