महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Agnipath Scheme : 'अग्निपथ' विरोधात हिंसक आंदोलन करणाऱ्या तरुणांना कोल्हापुरातील तरुणांचे उत्तर - ग्निपथ योजनेच्या विरोधात आज कोल्हापूरात निदर्शने

By

Published : Jun 20, 2022, 4:51 PM IST

कोल्हापूर - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 'अग्निपथ' ( Agneepath scheme) योजनेच्या विरोधात देशभरातील विविध राज्यात हिंसक आंदोलन ( Violent agitation in various states ) सुरू आहेत. काही ठिकाणी या योजनेचे समर्थन सुद्धा केले जात आहे. कोल्हापूरात सुद्धा अग्निपथ योजनेच्या विरोधात आज निदर्शने ( Protests against Agneepath scheme) करण्यात आली. येथील आर्मी भरतीसाठी प्रयत्न करत असलेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत शांततेच्या मार्गाने निदर्शने केली. शिवाय देशभरात हिंसक पद्धतीने सुरू असलेली आंदोलने सुद्धा अतिशय चुकीची असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. हिंसक आंदोलन न पटणारी असून शांतीत क्रांती करायची असते असा सल्ला सुद्धा कोल्हापूरातील युवकांनी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details