Jyotiba Yatra 2022 : जोतिबा चैत्र यात्रेस सुरुवात; पालकमंत्री, गृहराज्यमंत्र्यांनी घेतले दर्शन - क्षेत्र वाडी रत्नागिरी जोतिबाच्या चैत्र यात्रेस सुरुवात
कोल्हापूर - श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेस ( Jyotiba Yatra 2022 ) सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील ( Minister Satej Patil ) यांनी जोतिबाचे दर्शन घेऊन पूजा केली आहे. राज्यात चांगला पाऊस पडू दे, चांगली पिके येऊ देत, खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा सुखी होऊ दे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य कोविड मुक्त होऊ दे, असे साकडे सतेज पाटील यांनी जोतिबाला घातले आहे. त्याचप्रमाणे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई ( Minister Shambhuraje Desai ) यांनीही जोतिबाचे दर्शन घेऊन महाराष्ट्र राज्य हे देशात एकचे राज्य व्हावे, असे साकडे जोतिबा चरणी घातले आहे. कोल्हापूर - श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेस ( Jyotiba Chitra Yatra 2022 ) सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील ( Minister Satej Patil ) यांनी जोतिबाचे दर्शन घेऊन पूजा केली आहे. राज्यात चांगला पाऊस पडू दे, चांगली पिके येऊ देत, खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा सुखी होऊ दे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य कोविड मुक्त होऊ दे, असे साकडे सतेज पाटील यांनी जोतिबाला घातले आहे. त्याचप्रमाणे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई ( Minister Shambhuraje Desai ) यांनीही जोतिबाचे दर्शन घेऊन महाराष्ट्र राज्य हे देशात एकचे राज्य व्हावे, असे साकडे जोतिबा चरणी घातले आहे.