महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO: धक्कादायक.. तरुणाने रेल्वेच्या इंजिनखाली बसून केला अनेक किलोमीटरचा प्रवास.. रेल्वे थांबल्यावर.. - ETV Bihar

By

Published : Jun 7, 2022, 1:11 PM IST

गया : बिहारच्या गयामध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने अनेक किलोमीटर रेल्वे इंजिनच्या खाली बसून प्रवास केला. ज्यावेळी रेल्वे एका रेल्वे स्थानकावर जाऊन थांबली त्यावेळी रेल्वेच्या चालकाला रेल्वेखाली कोणीतरी रडत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर या तरुणाला रेल्वेच्या इंजिन खालून काढण्यात आले. लोकांनी रेल्वे चालकाच्या मदतीने तरुणाला बाहेर काढले. बाहेर काढले असता तो तरुण वैतागलेला असल्याचे लक्षात आले. बाहेर आल्यानंतर हा तरुण घटनास्थळावरून गायब झाला. ट्रॅक्शन मोटारीजवळील इंजिनखाली तो बसला होता. हे प्रकरण वाराणसी सारनाथ बुद्ध पौर्णिमा एक्स्प्रेसशी संबंधित आहे. राजगीरहून गयाकडे येणारी रेल्वे अनेक किलोमीटरचे अंतर कापून पहाटेच गया जंक्शनवर पोहोचली. रेल्वेचा चालक जेव्हा इंजिनमधून बाहेर आला तेव्हा कोणाच्यातरी रडण्याचा आवाज आला. चालकाने इंजिनच्या खालच्या भागात डोकावले तेव्हा तोही चक्रावून गेला. इंजिनच्या अरुंद बाजूला एक तरुण बसलेला त्याला दिसला. यानंतर रेल्वे प्रवाशांच्या मदतीने तरुणाला बाहेर काढण्यात आले. तरुणाची सुटका करण्यात आली, मात्र त्याची ओळख पटू शकली नाही. यादरम्यान तोही बेपत्ता झाला. ( Journey Under The Train Engine In Gaya )

ABOUT THE AUTHOR

...view details