जनता कर्फ्यू; बीड शहरातील मुख्य रस्त्यावर शुकशुकाट - janata curfew in beed city
बीडमधील इतर वेळी गजबजलेल्या ठिकाणी रहदारीचे रस्तेदेखील निर्मनुष्य आहेत. शहरातील सुभाष रोड, माळीवेस, जालना रोड, नगर रोड या मार्गांवर पोलीस फिरत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त रस्त्यावर कोणीच नाही. एकंदरीतच जनता कर्फ्यूला बीड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.