VIDEO : ज्येष्ठ अभिनेते डॉ.गिरीश ओक यांची विशेष मुलाखत... - झी मराठी वाहिनी
कोरोनाच्या काळात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. याचा प्रत्येक क्षेत्रावर परिणाम झाला. मराठी चित्रपटसृष्टीलाही याचा खूप मोठा फटका बसला. यादरम्यान, चित्रपट, मालिका, नाटकांची चित्रीकरण थांबविण्यात आले होते. मात्र आता लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथीलता देत काही नियम व अटींसह चित्रीकरण सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. नुकतीच झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेचे चित्रीकरण सुरु झाले आहे. ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील डॅा.अभिनेते गिरीश ओक याच्यांशी चर्चा केली आहे. पाहुयात ही विशेष मुलाखत...