महाराष्ट्र

maharashtra

VIDEO : महिला अन् तरुणीची रस्त्यावरच 'फ्री स्टाईल' हाणामारी.. एकमेकांना वाहिली शिव्यांची लाखोली

By

Published : Apr 30, 2022, 4:42 PM IST

इंदोर ( मध्यप्रदेश ) : इंदोरच्या टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला व तरुणींमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. एका ऑटोला कारची धडक झाली. ऑटोमध्ये महिला आणि तिची मुलगी बसले होते. तर कार एक तरुणी चालवत होती. धडक बसल्याचा कारणावरून ते आमनेसामने आले आणि त्यानंतर जोरदार वाद (indore fight between women and girl on road) झाला. टक्कर दिल्यानंतर ऑटोमध्ये बसलेली महिला बाहेर आली आणि तिने तरुणीसोबत वाद सुरू केला. काही वेळातच दोघींमध्ये भांडण सुरू झाले. कारमधील तरुणीला मारण्यासाठी महिलेने चप्पल काढली. वाढता वाद पाहून स्थानिक लोकांनी या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोघांनाही पोलिस ठाण्यात आणून समजावून सांगितल्यानंतर सोडून देण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Indori Women Fight Video Goes Viral)

ABOUT THE AUTHOR

...view details