महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Kobra in Kalyan : कोब्रा नाग अंडी गिळून झाला सुस्त, फणा काढून बसला कपाटात; कुटूंबाची उडाली झोप.. - Indian Kobra

By

Published : Oct 15, 2022, 1:11 PM IST

सापांच्या प्रकारापैकी असलेला कोब्रा नाग याची एक अजबच घटना समोर आली आहे. विषारी कोब्रा नाग अंडी गिळून सुस्त झाल्याने त्याला सरपटणे चांगलेच जीवावर गेले, त्यामुळे तो एका घरातील कपाटात फणा काढून बसल्याचे पाहून कुटूंबाची झोपच उडाली होती. ही घटना कल्याण पश्चिम भागातील सापर्डे गावातील (Indian Kobra in Saparde village of Kalyan West region ) एका घरात घडली आहे.सर्पमित्र दिनेशला कोब्रा नाग घरात शिरल्याची माहिती संजय गोडे यांनी दिली. माहिती मिळताच काही वेळातच सर्पमित्र दिनेश व दत्ता बोबे घटनास्थळी दाखल होऊन कपाटात फणा काढून बसलेल्या या सुस्त नागाला पकडून पिशवीत बंद केले. कोब्रा नाग पकडल्याचे पाहून गोडे कुटूंबाने सुटकेचा निश्वास घेतला. हा नाग इंडियन कोब्रा जातीचा असून 5 फूट लांबीचा आहे. या कोब्रा नागाला वन अधिकाऱ्याची परवानगीने आज जंगलात सोडल्याची माहिती सर्पमित्र दत्ता यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details