Congress Question Governor : मागील 8 वर्षापासून बाबासाहेबांच्या विचारांचा भारत दिसत आहे का?; काँग्रेसचा राज्यपालांना सवाल - भालचंद्र मुणगेकर मराठी बातमी
मुंबई - महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१ वी जयंती देशभर साजरी होत आहे. मुंबई मध्ये सुद्धा दादर चैत्यभूमी येथे बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, तसेच इतर नेतेही उपस्थित होते. यानंतर झालेल्या समारोप कार्यक्रमामध्ये बोलताना काँग्रेस नेते भालचंद्र मुणगेकर यांनी थेट राज्यपालांना प्रश्न विचारला आहे. मागील ८ वर्षापासून देशामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा भारत तुम्ही बघत आहात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केल्याने सर्वजण आवाक झाले ( Congress Question Governor ) आहे.