मुंबईत लॉकडाऊनविरुद्ध उद्रेक: 'ईटीव्ही भारत'ला प्रत्यक्षदर्शींनी सांगितली संपूर्ण घटना, पाहा व्हिडिओ - मुंबईत लॉकडाऊनविरुद्ध उद्रेक
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवल्याची घोषणा केली. याचे तीव्र पडसाद मुंबईत उमटताना दिसत आहेत. परराज्यातील हजारो मजुरांनी थेट वांद्रे स्टेशनबाहेर धडक दिली आणि आम्हाला आमच्या गावी जावू द्या, अशी मागणी करत ठिय्या मांडला. तेव्हा पोलिसांना नाईलाजास्तव सौम्य लाठिचार्ज करावा लागला आणि जमाव पांगवावा लागला. दरम्यान,वांद्रे स्थानकाबाहेर जमलेल्या जमावावर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले. मात्र खबरदारी म्हणून या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या इथं तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, या घटनेच्या प्रत्यक्षदर्शीने तिथं नक्की काय घडलं याची माहिती 'ईटीव्ही भारत'ला दिली.