हैदराबादेतील रामोजी फिल्म सिटीत रामोजी राव यांच्या हस्ते ध्वजारोहण
हैदराबाद - रामोजी फिल्म सिटीमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. रामोजी ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन रामोजी राव यांनी ध्वजारोहण केले. यावेळी रामोजी फिल्म सिटीचे व्यवस्थापकीय संचालक राममोहन राव आणि विजयेश्वरी, मानव संसाधन विभाग प्रमुख गोपाल राव, 'ईटीव्ही भारत' च्या संचालक बृहती आणि कंपनीचे इतर कर्मचारी उपस्थित होते.