आमदार रोहित पवारांची 'अशीही' फटकेबाजी - आमदार रोहित पवार लेटेस्ट न्यूज मुंबई
विक्रोळी पार्कसाईट येथे 'महाविकास आघाडी चषक' या नावाने भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या विभागातून क्रिकेटचे संघ आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा देखील उपस्थिती होत्या. यावेळी रोहित पवार यांनी मैदानात उतरून जोरदार फटकेबाजी केली.