VIDEO : वर्ध्यात मद्यपीने केला धिंगाणा, कारची काचे फोडली, नागरिकांनी दिला चोप - दारुड्या धिंगाणा वर्धा
वर्धा - वर्ध्यात बॅचलर रोडवर रविवारी रात्री एका मद्यपीने दारू पिऊन धिंगाणा घालत एका कारची काचे फोडली. यावेळी स्थानिकांनी दारुड्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. हा सगळा प्रकार शिववैभव मंगल कार्यालयाजवळ घडला. दारुड्याने काचा फोडत असताना काहींनी हे दृश्य मोबाइलमध्ये कैद केले. रामनगर पोलिसांनी घटनास्थळी येत मद्यपिला ताब्यात घेतले. प्राथमिक महितीनुसार तो जालण्याचा असल्याचे सांगितले जात आहे.