महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Teacher Beat a Child: निर्दयी शिक्षक! बेशुद्ध पडेपर्यंत लहान मुलाला मारहाण; मुलावर उपचार सुरू - teacher beat a child until he was unconscious

By

Published : Jul 3, 2022, 9:51 PM IST

पटना (बिहार) - राजधानी पाटणाच्या आसपास एका शिकवणी वर्गात शिकत असणाऱ्या 5 वर्षांच्या मुलाला शिक्षकाने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ( Child Brutally Beaten In Patna ) या व्हिडिओमध्ये एका निरागस मुलाला शिक्षक काठीने कसायाप्रमाणे मारहाण करत आहे. मुलगा मारहाण टाळण्याची विनवणी करतोय पण या शिक्षकाने काही ऐकले नाही. ( Child Brutally Beaten In Patna ) शेवटी मुलगा बेशुद्ध पडला. यानंतरही शिक्षक थांबला नाही. त्याने या मुलाला लाथा-बुक्क्यांनी मारले. दरम्यान, त्या मुलावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ही घटना पाहून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details