महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ganesh Chaturthi 2022 नाशिकात शाडू मातीचा बाप्पा साकारून विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरणाचा संदेश - Gave An Environmental Message

By

Published : Aug 23, 2022, 1:18 PM IST

यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक Ganeshotsav environmental supplement करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, गणेश मंडळ पुढे आले आहेत. बाजारपेठेत प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याने ते रोखण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शाडू माती पासून गणेश मूर्तीची Ganesha idol from shadu clay घरी स्थापना करावी या उद्देशाने नाशिकच्या महात्मा नगर विकास मंडळाच्या वतीने शाडू माती गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत शाडू माती पासून घरगुती गणेश मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. मूर्ती कलाकार कविता सोनवणे यांनी गणेश मूर्ती बनवण्याचे प्रात्याक्षिक करून दाखवले या कार्यशाळेत 200 हुन अधिक लहानग्या पासून मोठ्या सुध्दा आपल्या हातानी शाडू माती पासून गणेश मूर्ती साकारल्या. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पर्यावरण संवर्धनाचे कार्य व्हावे या उद्देशाने ही कार्यशाळा Ganesha Idol Workshop Nashik आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details