महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

87th Anniversary of Dharmantar भाकरीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सही, कलाकाराने हाताने कोरली प्रतिमा - धर्मांतर घोषणेचा 87 वा वर्धापन दिन

By

Published : Oct 13, 2022, 11:14 AM IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 आक्टोंबर 1935 साली येवला येथील मुक्तीभूमी येथे धर्मांतराची घोषणा केली होती. याच धर्मांतर घोषणाच्या 87 व्या वर्धापन दिनानिमित्त 87th Anniversary of Dharmantar Goshna येवला तालुक्यातील अंदरसुल येथील मंगेश शिंदे Artist Mangesh shinde यांनी भाकरीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar व मुक्तीभूमी येथील क्रांतीस्तंभाची प्रतिमा साकारली आहे. तसेच कडूबाई खरात kadubai kharat यांनी गायलेल्या एका सुप्रसिद्ध गाण्यांमध्ये देखील म्हटले आहे की, आपण खातो त्या भाकरीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सही आहे. ही सही देखील मंगेश शिंदे या कलाकाराने आपल्या हाताच्या साह्याने भाकरीवर साकारली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी येवल्यातील मुक्तीभुमी येथे धर्मांतराची घोषणा केली होती की, मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी देखील हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा येवल्यातील मुक्तिभुमी येथे केली.

ABOUT THE AUTHOR

...view details