महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : दोन वर्षांनंतर भरलेल्या कराडच्या कृष्णामाई चैत्र यात्रेला भाविकांची अलोट गर्दी, पाहा व्हिडिओ... - श्री कृष्णामाई मंदीर ट्रस्ट

By

Published : Apr 21, 2022, 3:24 PM IST

कराड (सातारा) - कोरोनामुळे गेली दोन वर्षे सण, उत्सव आणि यात्रा-जत्रांवर निर्बंध होते. निर्बंधमुक्तीनंतर दोन वर्षांनी कराडचे ग्रामदैवत कृष्णामाईची चैत्र यात्रा साजरी झाली. श्री कृष्णामाईच्या दर्शनासाठी तीन दिवस कराडकरांची कृष्णाघाटावर अलोट गर्दी होती. बुधवारी (दि. 20) रात्री उशीरापर्यंत कृष्णा घाट भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोरोना प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे सण, उत्सवावर कडक निर्बंध होते. त्यामुळे कोणताही सण, उत्सव साजरा झाला नव्हता. कराडचे ग्रामदैवत कृष्णामाईची क्षावणी आणि चैत्र यात्राही भरली नव्हती. निर्बंधमुक्तीनंतर यंदा कृष्णामाईची चैत्र यात्रा साजरी झाली. तीन दिवस कृष्णा घाटावर भाविकाची अलोट गर्दी होती. खेळणी, मेवा-मिठाईची दुकाने थाटण्यात आली होती. यानिमित्ताने प्रीतिसंगम बाग, कृष्णा घाट आणि कृष्णा नदीच्या वाळवंटाने अलोट गर्दी अनुभवली. अबालवृध्दांच्या गर्दीमुळे गेली तीन दिवस कृष्णा घाट फुलून गेला होता. श्री कृष्णामाई मंदीर ट्रस्टच्यावतीने दर्शनासाठी भाविकांची सोय करण्यात आली होती. प्रीतिसंगम बागेत नुकतीच पोलीस चौकी सुरू झाली आहे. त्यामुळे यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details