Video : शिवसेनेचे बंडखोर आमदार असलेल्या गुवाहाटीतील हॉटेल परिसरात कशी आहे परिस्थिती? ईटीव्ही भारतचा आढावा - Guwahati Assam
गुवाहाटी ( आसाम ) : विधानपरिषद निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेना आणि अपक्ष असे मिळून 35 हून अधिक आमदार सोमवारी रात्री सुरतला पोहोचले होते. बुधवारी रात्री सुरत विमानतळावरून ते सर्व गुवाहाटीकडे रवाना झाले. सकाळी ६ च्या सुमारास हे सर्व आमदार आसामची राजधानी गुवाहाटी येथे पोहोचले ( Eknath Shinde arrives in Guwahati ) आहेत. तेथे एका हॉटेलमध्ये या सर्व आमदारांची व्यवस्था करण्यात आली आहे. काय आहे हॉटेल परिसरातील परिस्थिती आढावा घेतला आहे ईटीव्ही भारत प्रतिनिधीने..