HM Dilip Walse Patil Shirur :...म्हणून शरद पवार देशात नवीन राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत; गृहमंत्र्यांचे सूचक विधान - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील शिरुर
पुणे - एकीकडे काँग्रेस पक्षाच्यावतीने राजस्थान येथे चिंतन सभा आयोजित करण्यात आली असून यासाठी देशभरात संघटन बांधणीसाठी तयारी देखील करण्यात येत आहे. तर दुसरीकडे गृहमंत्री दिलीप वळसे ( Home Minister Dilip Walse ) यांनी मोठे विधान केले आहे. देशाची अर्थव्यवस्था खाली गेली आहे. उद्योगधंदे खाली गेले आहेत. रोजगारांच्या संधी कमी झाल्या आहेत. केंद्र सरकार एक एक प्रकल्प बाजारात विकायला लागले आहे. विकायचे आणि मजा मारायची करायची ही भूमिका दिल्लीच्या सरकारची आहे. म्हणून राज्यात तर आपलं सरकार पाहिजे आणि दिल्लीतही आपल सरकार पाहिजे. यासाठी शरद पवार ( Sharad Pawar ) हे देशात नवीन राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे विधान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. ते शिरुरमध्ये बोलत होते.