Refinery Project Issue : रिफायनरी प्रकल्प करायचे की नाही हे केंद्राने ठरवावे - उदय सामंत - उदय सामंत यांचे रिफाइनरी बाबत विधान
रत्नागिरी - रिफायनरीबाबत ( Refinery project Issue ) राज्य सरकारची भूमिका उद्योगमंत्री सुभाष देसाई ( Industry Minister Subhash Desai ) यांनी केंद्र सरकारला कळवली आहे. त्यामुळे रिफायनरी बारसूमध्ये करायची की करू नये, हे केंद्र सरकार ठरवणार आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ( Education Minister Uday Samant ) यांनी दिली आहे. ते चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथे पत्रकारांशी बोलत होते. आता केंद्राने ठरवायचे की रिफायनरी करायचे की नाही, त्यामुळे काही लोकांनी केंद्रालाही प्रश्न विचारायला हवेत. दरम्यान निवडणूक लोकशाहीचा भाग आहे. निवडणूक कोणीही लढवावी, असेही उदय सामंत यावेळी विरोधकांच्या निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर म्हणाले. दरम्यान लोकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, असेही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले.