Heavy Rains Kolhapur : कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस - कोल्हापुरात मुसळधार पाऊस
कोल्हापूर - हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज (गुरुवारी) सायंकाळी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे तसेच अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील काही भागात गारांचा सुद्धा पाऊस झाला. सकाळपासूनच उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तर जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा झालेल्या पावसामुळे हवेमध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. जवळपास अर्धा ते पाऊण तास कोल्हापुरात विजेच्या कडकडाटासह धुवांधार पाऊस आणि वारा सुरू होता.