Heavy Rain शहरात धुव्वाधार पाऊस, व्यापाऱ्यांचे झाले मोठे नुकसान - Heavy rains in pune
पुणेसह राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. काल रात्री ९ नंतर सुरु झालेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडवली. त्यामुळे अवघ्या १२ तासांपेक्षा कमी कालावधीत शहरात तब्बल १०४ मिलीमीटर पावसाची नोंद 104 millimeters of rain was recorded in city झाली आहे. पावसाने पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर तसेच दुकानामध्ये पाणी शिरले. पुण्यातील मंडई येथील शिवाजी रोड वरील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा पाणी गेल्याने मोठा नुकसान या दुकानदारांना झाला आहे .